'दिशा'ची फाईल उघडणं संजय राऊतांना का खुपतयं?

    27-Dec-2022
Total Views | 44



'दिशा'ची फाईल उघडणं संजय राऊतांना का खुपतयं?
मुंबई : "५० खोक्यांसाठी एसआयटी स्थापन करा." संजय राऊतांच्या या वक्तव्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर म्हणाले, ज्यांनी खोके घेतले त्यांनाच खोक्याचे महत्त्व असते. खोके काढायचे असतील तर ज्याचे काढायचे आहेत त्याचे काढले जातील. आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत. चार-चार वेळा निवडून आलेले आमदार पैशासाठी फुटतील का?विनाकारण लोकं दुखावली जातील, असे बोलू नका, असा प्रश्न देखील केसरकर यांनी उपस्थित केला आहे.
 
 
"ठाकरे गटाला का लागतं ते काही कळत नाही? आम्ही ठाकरेंचं नाव घेतलं आहे का? न्याय दिशा सालियन हिला द्यायचा आहे पण ही गोष्ट यांना का लागते? एसआयटी या केसमध्ये तपास करेल आणि कोणी दोषी असेल त्याला शिक्षा होईल." असे देखील केसरकर म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121