मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई-नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. उपमुख्यमंत्री म्हणाले की, "या महामार्गाचे स्वप्न २० वर्षांपूर्वी पहिले होते. मात्र पंतप्रधान मोदी नसते तर हे स्वप्न साकार झाले नसते." असे वक्तव्य फडणवीसांनी यावेळी केले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "आम्हाला तुमच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करायचे होते. तुम्ही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते तर हे स्वप्न पूर्ण झाले नसते. तुमच्या पाठिंब्यामुळे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. एकीकडे मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महामार्गासाठी मेहनत घेत आहेत. महामार्गाच्या संपूर्ण ७०० किमी साठी आम्ही केवळ ९ महिन्यात जमीन संपादित केली." असे उपमुख्यमंत्री म्हणाले.