रिझर्व्ह बँकेच्या वाढत्या व्याजदरांचा फटका! या बँकांची कर्जे महागली

    02-Nov-2022
Total Views | 54
interest rates
 
 
 
मुंबई : देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे. ज्याचा मोठा फटका बँकांच्या कर्जदारांना बसला आहे. ३० सप्टेंबरच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने आपले व्याजदर वाढीचेच धोरण कायम ठेवत ०.५ टक्यांनी व्याजदर वाढवले होते. त्यामुळे आता रेपो रेट ५.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा परिणाम आता दिसायला लागला आहे. सर्व सरकारी आणि खासगी बँकांनी सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदर वाढवले आहेत. त्यामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज ही सर्व कर्ज महागली आहेत.
  
भारतातील खासगी क्षेत्रातील प्रमुख बँक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये ०.२० टक्क्यांची वाढ केली आहे. तर दुसरी प्रमुख बँक इंडियन बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये ०.३५ टक्क्यांची वाढ केली आहे. साधारणतः जून पासून या सर्व बँकांनी आपल्या व्याजदरांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. याआधी दिवाळी, नवरात्रीचे उत्सवांचे दिवस लक्षात घेऊन बँकांनी आपली कर्जे स्वस्त करण्याकडे कल ठेवला होता. पण आता ही परिस्थिती बदलायला सुरुवात केली आहे. ३ नोव्हेंबर रोजी रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत व्याजरदारांबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121