ज्या चित्रपटाची आणि ज्या अभिनेत्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत तो चित्रपट म्हणजे दृश्यम २. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. २०१५ साली अजय देवगणची मुख्य भूमिका असणारा 'दृश्यम' चित्रपट आला आणि लोकांच्या पसंतीस देखील उतरला. मागील काही दिवसांपूर्वीच दृश्यम २ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि पुन्हा दृष्यमची चर्चा सुरु झाली. उत्कंठावर्धक आणि पावलोपावली प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारा दृष्यम २ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अजय देवगणचा प्रभावी अभिनय आणि चित्रपटातील दमदार संवाद यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांना वेडावून टाकले होते. साऊथच्या चित्रपटाचा रिमेक असूनही दृश्यम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
दृष्य़म २ मध्ये मीरा देशमुखचा आपल्या मुलापर्यंत पोहचण्याचा प्रवास अजुनही सुरु असून तिला काही केल्या आपल्या मुलाच्या गुन्हेगाराला शोधून काढायचे आहे. "सत्याला तुम्ही कितीही हरवण्याचा करण्याचा प्रयत्न केला तरी ते काही पराजित होत नाही. याउलट ते वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यत ते येतेच". जे सत्य सात वर्षांपासून समोर पाण्याचा प्रयत्न मीरा देशमुख करत आहे ते सत्य खरंच समोर येईल का? विजय साळगावकर खरंच आपला गुन्हा मान्य करेल का? असे अनेक प्रश्न चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आपल्या मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
वायकॉम १८ स्टुडिओच्या वतीने आणि टीसीरिजने या चित्रपटाची निर्मिती केली असून त्याचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. मुळ साऊथच्या दृष्यमचा रिमेक असणाऱ्या हिंदी दृष्यमच्या पहिल्या भागाने तरी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. त्यानंतर आता तब्बल सात वर्षानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग १८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.