दिल्लीतील ‘आयईडी’चे ‘पाकिस्तान कनेक्शन’

    18-Jan-2022
Total Views | 94

IED-blast
  
 
 
नवी दिल्ली : दिल्ली येथील गाझिपूर फूल मंडईमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांशी संबंधित तपास अहवाल दिल्ली पोलिसांना ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ अर्थात ‘एनएसजी’ने नुकताच सादर केला आहे. त्यामध्ये सापडलेल्या स्फोटकांचे ‘पाकिस्तान कनेक्शन’ असल्याचे पुढे आल्याचे समजते. ‘आयईडी’मध्ये ‘अमोनियम नायट्रेड’ आणि ‘आरडीएक्स’चा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. स्फोटासाठी ‘टायमर’ही ‘सेट’ करण्यात आला होता. त्यासाठी त्यामध्ये ‘एबीसीडी स्वीच’ही बसवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा प्रकारच्या ‘स्वीच’चा वापर पाकिस्तानी दहशतवादी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
 
 
जिहादी दहशतवादी काश्मीर आणि अफगाणिस्तानमध्ये बॉम्बस्फोटांसाठी ‘आयईडी’मध्ये ‘एबीसीडी स्वीच’चा वापर करतात. हे ‘स्वीच’ आणि ‘टायमर’ वापरून स्फोटाची वेळ पुढील काही मिनिटे ते सहा महिन्यांपर्यंत निश्चित करता येते. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ आणि त्यांचे ‘स्लिपर सेल’ बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत असल्याची पुष्टी तपास अहवालात करण्यात आली आहे. दिल्ली येथील गाझिपूरसह श्रीनगर आणि अटारी येथेही १४ जानेवारी रोजी स्फोटके सापडली होती. त्यावेळीच गुप्तचर यंत्रणांनी हा ‘आयएसआय’ पुरस्कृत प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121