मुंबई : आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विनवरून मुंबई महापालिकेतील वातावरण पुन्हा तापलं आहे. मुंबई महापालिकेच्या राणी बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, असे मुंबई काँग्रेसने म्हटले आहे.
मुंबई महापालिकेत पेंग्विनवरील खर्च दिवसेंदिवस वाढत असून तीन वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी १५ कोटींची निविदा काढण्यात आल्याने काँग्रेसने ही टीका केली आहे. यापूर्वी गेल्या तीन वर्षांसाठी ११ कोटींची निविदा काढण्यात आली होती. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय, असा सवालची काँग्रेसचे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.