टोकियो पॅरालिम्पिक २०२० : 'सोनेरी शनिवार' भारताने पटकावले २ सुवर्ण

टोकियो पॅरालिम्पिक २०२० : "सोनेरी शनिवार" भारताने पटकावले २ सुवर्ण

    04-Sep-2021
Total Views | 87

pramod_1  H x W
 
 
मुंबई : भारताने शनिवारी आणखी एका सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. यावेळी पॅराबॅडमिंटनपटू प्रमोद भगतने पुरुष एकेरी एसएल ३ प्रकारात सुवर्ण पदक पटकावून आणखी विक्रम रचला आहे. तर, दुसरीकडे पॅराबॅडमिंटनपटू मनोज सरकारने कांस्य पदक पटकावत पदकांच्या संख्येत वाढ केली आहे. आता भारताच्या नावावर तब्बल १७ पदके असून ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकच्या इतिहासातील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.
 
 
 
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानकावर असलेल्या प्रमोद भगतने पुरुष एकेरी एसएल ३ प्रकारात ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा २१-१४, २१-१७ असा सरळ सेटमध्ये पराभव करत अंतिम सामन्यात विजय मिळवला. याचसोबत देशाला चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले. सामना जिंकताच प्रमोद आणि प्रशिक्षांकांना आनंदाश्रू आवरता आले नाही. तर दुसरीकडे याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डायसुके फुजीहाराला २२-२० आणि २१-१३ अशी सरळ मात करत देशासाठी कांस्य पदक पटकावले. आता भारताकडे १७ पदके असून यामध्ये ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121