टोकियो पॅरालिम्पिक २०२० : अवनीचा दुहेरी इतिहास, तर प्रवीणची विक्रमी कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिक २०२० : अवनीचा दुहेरी इतिहास, तर प्रवीणची विक्रमी कामगिरी

    03-Sep-2021
Total Views | 87

paralympic_1  H
 
 
टोकियो : शुक्रवारची सकाळ ही भारतीयांसाठी पुन्हा एकदा ऐतिहासिक ठरली. कारण सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अवनी लेखराने नेमबाजीत आणखी एक पदक स्वतःच्या नावावर केले आहे. तिने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच१ स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. याचसोबत तिने पॅरालिम्पिक स्पर्धेत अनेक नवे विक्रम रचले आहेत. याचसोबत प्रवीण कुमारने टी ६४ उंच उडी प्रकारात रौप्य पदक पटकावले आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक पटकावणारा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे.
 
 
अव्वल अवनीची 'दुहेरी' कामगिरी
 
 
भारतीय नेमबाज अवनी लेखराने महिलांच्या ५० मीटर रायफल प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. यापूर्वी तिने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये २४९.६ गुणांसह सुवर्ण पदक पटकावले. याचसोबत तिने पॅरालिम्पिकमध्ये २ पदके जिंकणारी पहिली महिला खेळाडू होण्याचा मान पटकावला आहे. तसेच, ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये २ पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय नेमबाज तर ठरलीच, शिवाय ती अशी कामगिरी करणारी पहिलीच भारतीय खेळाडूदेखील ठरली आहे. तिच्या या कामगिरीमुळे देशभरातून तिचे कौतुक होत आहे.
 
पदक पटकावणारा सर्वात तरुण भारतीय प्रवीण
 
१८ वर्षीय प्रवीण कुमारने टी ६४ उंच उडी प्रकारात रौप्य पदक पटकावले. एवढ्या कमी वयात पदक पटकावणारा तो सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच, २.०७ मीटर उंच उडी मारत त्याने नवा आशियाई विक्रम रचला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121