जम्मू – काश्मीरमधून दहशतवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

अफगाणिस्तानच्या स्थितीकडे भारताचे बारकाईने लक्ष

    30-Aug-2021
Total Views | 79
RS_1  H x W: 0

अफगाणिस्तानच्या स्थितीकडे भारताचे बारकाईने लक्ष
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरमध्ये आता परिस्थिती बदलली असून कलम ३७० आणि ३५ अ संपुष्टत आल्यामुळे फुटीरतावाद्यांना मिळणारी ताकद संपुष्टात आली आहे. त्यामुळे फुटीरतावादी आता कमकुवत झाले असून लवकरच काश्मीर दहशतवाद मुक्त होईल, असा विश्वास देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केले. दिवंगत बलराम टंडन स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते.
 
 
जम्मू – काश्मीरमध्ये परिवर्तन आणि विकासाचे नवे पर्व सुरु झाले आहे. कलम ३७० आणि ३५ अ संपुष्टात आणल्याने तेथे फुटीरतावाद्यांना मदत मिळणे आता बंद झाले आहे. परिणामी फुटीरतावादी आता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाले असून त्यामुळे जम्मू – काश्मीर आता लवकरच दहशतवादमुक्त होणे साध्य होणार आहे. त्याचप्रमाणे जम्मू – काश्मीरमध्ये दहशतवाद रोखण्यासाठी गेल्या सात वर्षांमध्ये सैन्य आणि सुरक्षा दले अतिशय प्रभावी कारवाई करीत आहेत. दहशतवादाविरोधात लढण्यासाठीची रणनिती, प्रत्युत्तर देण्याच्या पद्धतीमध्ये केलेला बदल यामुळे काश्मीरमध्ये दहशतवादाचा खात्मा होण्यास प्रारंभ झाला आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
 
 
पूर्व लडाखमधील गालवानच्या घटनेमध्ये भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य आणि पराक्रम गाजविण्यासोबतच संयमही दाखविल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, एलएसीवर कोणत्याही प्रकारच्या एकतर्फी कारवाईकडे दुर्लक्ष न करण्याचे स्पष्ट निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यदलांना दिले आहे. गालवान येखे भारतीय सैन्याने त्याचेच पालन केले आणि शौर्य गाजवून पीएलएल सैनिकांना (चिनी सैन्य) मागे हटण्यास भाग पाडले. गतवर्षी पूर्व लडाखमध्ये घडलेली घटना ही पूर्णपणे चिनची आगळीक होती. मात्र, एलएसीवर चिनी सैन्यास एकतर्फी बदल करता येणार नाही, असे भारताने स्पष्ट शब्दात सांगितल्याचेही राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
अफगाणिस्तानच्या स्थितीकडे बारकाईने लक्ष
 
 
अफगाणिस्तानमध्ये सध्या जे काही घडत आहेत, त्याकडे भारताचे बारकाईने लक्ष आहे. भारतीयांच्या सुरक्षेसोबतच तेथील परिस्थितीचा फायदा घेऊन देशविरोधी शक्तींना सीमापार दहशतवादास प्रोत्साहन देऊ नये, यासाठी भारत सतर्क आहे. परिस्थिती पाहता राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सक्षम असून आकाश, पाणी, जमीन अशा कोणत्याही बाजूने येणाऱ्या संकटांचा बिमोड करण्याची भारताची क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय स्वाभिमान आणि राष्ट्रोत्थानाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर तडजोड करणार नाही, याची देशवासियांना ग्वाही देत असल्याचेही राजनाथ सिंह म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121