मच्छीमारनगरचा वाली कोण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Aug-2021   
Total Views |
 koli_1  H x W:
 
 
मराठी अस्मितेचे भांडवलदार कोळी बांधवांच्या प्रश्नांवर उदासीन कोळी भगिनींच्या त्रासाला अंत नाही
 
 
 मुंबई : मुंबईतील माहीम भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेले कोळी बांधव मोठ्या कालावधीपासून आपल्या जगण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, त्यांचे दु:ख संपायचे नाव घेत नाही. मराठी संस्कृतीचा वारसा सांगणार्‍या या कोळी बांधवाच्या समस्यांच्या निराकरणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी फारसे उत्सुक नाहीत. पण, दुर्दैवाची बाब म्हणजे मराठी अस्मिता नावाच्या भांडवलातून लोकांच्या पिळवणुकीचा पिढीजात व्यवसाय क मराठी अस्मितेचे भांडवलदार कोळी बांधवांच्या प्रश्नावर मात्र उदासीन कोळी भगिनींच्या त्रासाला अंत नाही.माहीमच्या वॉर्ड क्रमांक 182मधील नागरिक आणि विशेषत: कोळी समाजातील लोक सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत एक-एक दिवस पुढे ढकलत आहेत.
 
 
 माहीमच्या या मच्छीमारनगराला कोळी समाजाच्या वैभवशाली संस्कृतीची सुंदरशी किनार आहे. मात्र, दुर्दैवाने या भागातील स्थानिक कोळीबांधवांचे जगणे आता हालाखीचे झाले आहे.माहीमची खाडी सुप्रसिद्ध आहे. या खाडीतील शिवल्या आणि मासे मिळवून या भागातील कोळी बांधव आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चाललेल्या मुंबईतील माहीमच्या खाडीत मागील काही वर्षांपासून मिठी नदीचे रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे माहीमच्या खाडीत सापडणारे शिवले आणि मासे या दूषित पाण्यामुळे लुप्त झाले आहेत. त्यामुळे मच्छीमारनगरातील कोळी बांधवांच्या मूळ मासेमारी या व्यवसायावर कुर्‍हाड कोसळल्याने त्यांच्या दैनंदिन अर्थार्जनाचा गहन प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
 
पर्यावरण मंत्रालय झोपले आहे का?
माहीमच्या खाडीत सोडल्या जाणार्‍या या दूषित पाण्यामुळे खाडीतील जलचर मृत्यू पावत आहेत. खाडीतील हे शिंपले, मासे जगवण्याचे काम करणे सध्या अत्यावश्यक आहे. ते न केल्यामुळे तर मासे आणि मासेमारीवर अवलंबून असलेले घटक दोघांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे दूषित पाणी सोडण्यावर आणि दूषित पाणी सोडणार्‍यांवर प्रशासन आणि राज्याच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे कारवाई का केली जात नाही? यावर बोलायला मात्र कुणीही तयार नाही.तर दुसरीकडे या मच्छीमारनगरात एक जुना मासळीबाजार आहे. त्यात जेमतेम दहा ते 15 कोळी भगिनी मासे विकण्यासाठी बसू शकतात, अशी त्याची स्थिती आहे. मच्छीमारनगरात मासे आणि तत्सम जलवीज विकणार्‍यांची संख्या आता हळूहळू वाढली आहेे.
 
 
नव्याने मासेविक्रीसाठी येत असलेल्या विक्रेत्यांना जुन्या मासळी बाजारात मासेविक्रीसाठी जागाच नाही. त्यामुळे सध्या 200पेक्षाही जास्त मासेविक्री करणार्‍या महिला बाहेर खुल्या रस्त्यावर मासे विकत आहेत. मात्र, त्यांना पाणी अथवा शौचालय किंवा तत्सम कुठलीही मूलभूत सुविधा पुरविण्यात येत नाही. या असुविधांच्या विरोधात आवाज उठविणार्‍या विक्रेत्यांना जुन्या मार्केटचा दाखला दिला जातो. मात्र, त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचे संवर्धन व्हावे, अर्थार्जन करताना त्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, हीच खरी या मासेविक्रेत्यांची शोकांतिका आहे.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@