रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुलांच्या शाळांच्या मुद्यावरून गंभीर इशारा
मुंबई : महाराष्ट्रसह ईतर देशांमध्ये "कोरोना"च संकट असताना राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता दीड वर्ष होऊनही अद्याप कोणतेही शाळा आणि कॅालेज सुरु झालेले नाहीत, यापूर्वी राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी अनेकदा निर्णय घेऊन ही शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास अपयशी ठरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी खंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली
मुलांच्या शिक्षणात गती आणण्यात आणखी विलंब हा आगामी दशकांपर्यत देशासाठी त्रासदायक ठरू शकतो.मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं आहे, याची कल्पना करा. समस्या फक्त एवढीच नाही की ते पुढे जात नाहीत, पण ते विसरतही आहेत. जर तुम्ही मुलांना दीड वर्षापासून शाळेबाहेर ठेवत असाल, तर परत गेल्यावर ते कदाचित तीन वर्ष मागे गेलेले असतील." मुलांच्या भवितव्या बद्दल गंभीर ईषारा रघुराम राजन यांनी दिल्याने मुलांच्या शैक्षिणिक मानसिकतेत पुर्वीसारखा बद्दल घडवूण आणण्यासाठी राज्य सरकार काय पाऊले उचलतील ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.