नवी दिल्ली : खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या आयपीओची चर्चा बऱ्याचदा झाली. विशेष म्हणजे तोट्यात जाऊनही बुधवारी झोमॅटोचा शेअर पाच टक्क्यांनी वधारला आहे. तोट्यात असूनही अनेक गुंतवणूक सल्लागार कंपनीचा शेअर खरेदी करण्याचे सांगत आहेत.
जेफरीज या गुंतवणूक सल्लागार कंपनीनेही झोमॅटोचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणूक सल्लागार कंपन्यांतर्फे झोमॅटो हा शेअर १७५ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त करत आहेत. १७० कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. FY22-24 रेवेन्यू एस्टिमेट 10-20 टक्के वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. कंपनीचे नुकसान एप्रिल ते जून या तिमाहीत 256 टक्क्यांवरून वाढत 356.2 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हे नुकासान 99.8 कोटी रुपये इतके होते.