विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हेनी दिले आरोपत्र दाखल करण्याचे आदेश
पुणे: शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात घडली होती. दि. १४ जुलै, २०२१ रोजी पुण्यामध्ये एका नामवंत महाविद्यालयात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षकांनीच त्रास देऊन लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यांची दाखल घेत विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी फिर्याद दाखल करून घेऊन समुपदेशन करण्याच्या सुचना केल्या होत्या.
या विद्यार्थिनीने आई-वडींलासह पुण्यात नीलम गोऱ्हे यांची निवासस्थानी भेट घेतली. संपूर्ण घटनेची दाहकता लक्षात घेत गोऱ्हे यांनी या घटनेबद्दल आरोपीच्या विरोधात लवकरात-लवकर दोषारोप पत्र दाखल करण्यासंदर्भात वरिष्ठ पोलिसांना सूचना देण्यात येईल असे आश्वासन दिले.तसेच या मुलीला योग्य न्याय मिळावे म्हणून ही केससंबंधी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्यात यावे याकरीता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र देण्यात येईल असेही नीलम गोर्हेनी सांगितले. या प्रकरणात सर्व विद्यार्थिनीला सर्व प्रकारची कायदेशीर मदत करू व न्याय मिळवून देऊ असेही डॉ.गोऱ्हे यांनी या वेळी सांगितले.
याबाबत बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आरोपी शिक्षकाचं निलंबन झालं आहे की नाही याबाबत मुलीच्या मनात भीती होती. मात्र प्राचार्यानी निलंबन झालं असल्याची माहिती दिली. ऍड. उज्वला पवार यांनी विशेष वकील म्हणून काम पाहावं अशी कुटुंबीयांची मागणी होती. त्यानुसार गृहमंत्र्यांकडे आणि पुणे शहर पोलिस आयुक्तांकडे करत आहोत. या मुलीने स्वतःहून पुढे येऊन निकाल लागेपर्यंत आणि पुन्हा मुलींसोबत भविष्यात असे प्रसंग घडू नये म्हणून समाज जनजागृती करण्याच्या कामासाठी तयारी दर्शविली आहे, त्यानुसार आता पुढील सर्व बाबी सुरु आहेत, ही माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली