धक्कादायक! लहान मुले पसरवताहेत सर्वाधिक कोरोना

    08-May-2021
Total Views | 152

covid bychild_1 &nbs

सर्वेक्षणातून माहिती उघड : मुले सुपरस्प्रेडर ठरणार नाहीत ना !

 
 
 
नवी दिल्ली : कोरोनाच्या नव्या लाटेत मुलांमध्ये कोरोना संक्रमण जास्त वेगाने होत आहे, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, आता कोरोना बाधित मुलेच जास्त वेगाने कोरोना विषाणू पसरवत असल्याचा धक्कादायक खुलासा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे.
 
 
 
'अमेरिकन मेडिकल असोशिएन'च्या अहवालानुसार मुले प्रौढांपेक्षा जास्त वेगाने कोरोना संक्रमित करतात. प्रोढांच्या तुलनेत मुलांमध्ये कोरोना विषाणू वाहून नेण्याची क्षमता जास्त असते. या प्रक्रीयेला व्हायरल लोड म्हणतात. नव्या अहवालानुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या मुलांमध्ये व्हायरल लोड जास्त असतो. विषाणू संक्रमणाचा वेग हा मुलांमध्ये दहा ते शंभर पटीने अधिक असतो.
 
 
 
सर्वसामान्य कोरोना बाधिताच्या तुलनेत मुलांच्या नाकात आणि घशात विषाणू जास्त राहतात. कोरोना बाधित मुलांची काळजी घेणाऱ्यांनी अधिक सावध असणे गरजेचे आहे. उपचार करताना मुलांची दोन गोष्टींसाठी विशेष काळजी घ्यायला हवी, असे तज्ज्ञ सांगतात.
 
 
 
कोरोनाची दुसरी लाट आणि हा अहवाल भयावह परिस्थिती दर्शवणारा आहे आणि दुसरे कारण म्हणजे मुलांमुळे इतरांनाही असणारा धोका. शक्यतो वेळेत लसीकरण मोहिम सुरू करणे हेच हा अहवाल सुचवतो. जगभरात अनेक ठिकाणी मुलांवरती प्रभावी ठरणारी लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. 'फायझर' आणि 'मॉडर्ना' सारख्या कंपन्या अशा डोसवरती काम करत आहेत. या लसी विविध वयोगटानूसार आणि प्रत्येकाच्या क्षमतेनूसार दिल्या जातील.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121