महाराष्ट्राला देशात आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा- पीयूष गोयल यांची माहिती

    17-Apr-2021
Total Views | 95



ppp_1  H x W: 0




नवी दिल्ली : देशातली परिस्थिती लक्षात घेऊन देशात जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती होईल, यासाठी केंद्र सरकार सर्व संबंधित घटकांसोबत, पूर्ण प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्री रेल्वे, वाणिज्य आणि उद्योगमंत्री, तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. या संदर्भात केलेल्या एका ट्विट मध्ये त्यांनी सांगितले की, सध्या देशात एकूण क्षमतेच्या 110 टक्के ऑक्सिजन निर्मिती होत आहे.


तसेच औद्योगिक वापरासाठी असलेल्या सर्व ऑक्सिजनचा साठा वैद्यकीय वापराकडे वळवण्यात आला आहे. केंद्र सरकार, सर्व राज्यांच्या सतत संपर्कात असून, त्यांच्या आवश्यकता समजून घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही गोयल यांनी सांगितले. कालच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्सिजनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला आणि केंद्र आणि राज्याने या संकटकाळात परस्पर समन्वयाने काम करावे, अशी सूचना केल्याचे गोयल यांनी सांगितले.


@OfficeOfUT’s gimmicks on oxygen. GoI, with all stakeholders, is ensuring maximum oxygen production in India. We are currently producing 110% of Oxygen generating capacity and diverting all available Oxygen from industrial use to medical use.

— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 17, 2021 ">

या मुद्यावर राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या राजकारणबाबत खेद व्यक्त करत, महाराष्ट्राला आजवर देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा झाला आहे, अशी माहिती गोयल यांनी या ट्विट्समध्ये दिली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121