पुण्यातील मे. एस महालक्ष्मी मोटर्स, मांजरी येथे उपक्रमाचे उद्घाटन
पुणे : कोरोनासारख्या महामारीच्या काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन 'आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'तर्फे 'आयुषमान आधार' या उपक्रमाअंतर्गत सहा राज्यांमध्ये सहा रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील 'मे. एस महालक्ष्मी मोटर्स, मांजरी' येथून करण्यात आला. आयुषमान आधारतर्फे देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. 'सीएसआर'च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जाते.
'आयुष्मान आधार' अंतर्गत आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडतर्फे कोरोना महामारीच्या काळात देशातील सात राज्यांमध्ये एकूण शंभर मोफत वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. कंपनीसह अंमलबजावणी भागीदार 'वाय फोर डी फाउंडेशन'तर्फे वंचितांच्या सशक्ती करणाचाप्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून सहा रुग्णवाहिका दान केल्या जाणार असल्याची माहिती उपक्रमातील सदस्यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या संकटात जिथे रुग्णवाहिकांचा तुटवडा भासत आहे अशा काळात असे उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. या रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीत खास वाहन म्हणून वापरले जाणार आहेत. पुण्यातील 'मे महालक्ष्मी मोटर्स, मांजरी, येथून तुषार देसाई (सीईओ - युनिक्रोनिक सिस्टिम), रामकृष्णन (प्रादेशिक विक्री व्यवस्थापक आणि अखिल भारतीय विक्रेता प्रमुख), अर्चना अक्षय कोळी (वरिष्ठ जनसंपर्क व्यवस्थापक, आधार हाउसिंग फायनान्स लिमिटेड, मुंबई) आणि प्रफुल्ल निकम (अध्यक्ष वाय फोर डी फाउंडेशन, पुणे) यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
तुषार देसाई म्हणाले “'आधार'च्या या पुढाकाराने असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकेल कारण रुग्णवाहिकांच्या मदतीने रुग्णांना आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य मिळू शकेल आणि वेळेवर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करता येऊ शकेल, मी आधार सामाजिक लाभासाठी घेत असलेल्या पुढाकारासाठी त्यांचे खरोखर कौतुक करतो”
रामकृष्णन म्हणाले, “आधार हाउसिंग फायनान्स ही समाजातील अल्प उत्पन्न वर्गातील लोकांच्या घराचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनीचा आयुष्मान आधार हा पुढाकार हा आपल्या देशातील आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे. ”
'वाय 4 डी फाऊंडेशन'चे अध्यक्ष प्रफुल निकम म्हणाले “आधारद्वारे दान केलेली रुग्णवाहिका तातडीने वैद्यकीय सेवेची गरज असलेल्यांना घटनास्थळावर उपचार देण्यासाठी आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविते आणि यामुळे रूग्ण विशेषत: वंचितांना त्या ठिकाणच्या आसपासच्या व्यक्तींकडे पुढील काळजी घेण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी वाय 4 डी फाउंडेशनचे ऑपरेशन हेड, सागर मानकर यांच्याशी +91 8855026225 / sagar@y4d.ngo संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.