हितेशा चंद्राणीच्या आरोपांना डिलीव्हरी बॉयचे दिले प्रत्युत्तर
बंगळुरू : झोमॅटो डिलिव्हरी बॉयने बंगळुरूमध्ये एका ग्राहक महिलेला नाकावर बुक्का मारल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात आता नवा खुलासा करत झोमॅटो कर्मचाऱ्याने या प्रकरणी नवा खुलासा केला आहे. महिलेने माझ्या नाकाला नख लावण्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील तक्रारदार महिला हितेशा चंद्राणी नावाची महिला इन्स्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केली हेती.
महिलेची वर्तणूक चुकीची : कर्मचाऱ्याचा आरोप
कामराज या डिलिव्हरी बॉयने 'द न्यूज मिनट' या वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती दिली आहे. त्यात तो म्हणाला, "मी त्यांच्या घराजवळ पोहोचलो होते. दरवाजा उघडल्यावर त्यांना जेवण दिले. महिलेने 'कॅश ऑन डिलिव्हरी' हा पर्याय स्वीकारला होता. पैसे घेण्यासाठी मी थांबलो होतो. ट्राफिक आणि रस्ते खराब असल्याने मला ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाला होता. मी त्यांची माफी मागितली होती. मात्र, त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन करणे सुरू केले. जेवण उशीरा आले म्हणून माझ्यावर त्या संतापल्या."
"त्या पैसे देण्यास तयार नव्हत्या म्हणून मी निघण्याचा निर्णय घेतला आणि मी लिफ्टकडे वळलो. तेव्हा महिलेने मला हिंदीतून शिविगाळ केली. मला चप्पलेने मारले. त्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मी हात पुढे केला. ती माझा हात झटकत होती. या झटापटीत चुकीने माझा हात तिच्या नाकावर लागला. माझ्यामुळे नाकाला मार लागल्याचा खोटा आवही त्यांनी आणला आहे. इन्स्टाग्रामवर जो कुणी व्हीडिओ पाहिल त्याच्या लक्षात येईल की हे एका बुक्क्यामुळे झालेले नाही. तिच्या नाकावर ठसा उमटलेल्या अंगठीचा निशाण पाहिला तर लक्षात येईल की अंगठी तिनेच घातली आहे. मी अंगठी घालत नाही." या नव्या खुलाशामुळे पुन्हा एकदा महिलेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या हितेशा चंद्राणीने ९ मार्च दुपारी ३.३० वाजता जेवणाची ऑर्डर दिली होती. मात्र, ही ऑर्डर दुपारी ४.४० वाजता पोहोचली. एक तास उशीर झाल्यामुळे तिने ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. हितेशा म्हणाली, व्यवहार रद्द करा किंवा मला जेवण मोफत द्या. ज्यावेळी झोमॅटो कर्मचाऱ्याला ही ऑर्डर मोफत देण्यास सांगितली तेव्हा कर्मचारी कंपनीकडून त्या संदर्भातील आदेश येण्याची वाट पाहत होता.
आणखी उशीर होत असल्याने हितेशाचा संताप अनावर झाला होता. ऑर्डर रद्द करण्यासाठी डिलिव्हरी बॉयनेही नकार दिला. हितेशाने इस्टाग्रामवर व्हीडिओ शेअर केला त्यात म्हटल्या प्रमाणे, कर्मचाऱ्याला वाट पाहायला लावल्याने तो आक्रमक झाल्याचे म्हटले. "माझ्यावर तो ओरडला. म्हणून मी दरवाजा बंद केला होता. कर्मचारी जबरदस्ती माझ्या घरात घुसला. त्यानंतर तो ऑर्डर घेऊन पळाला. तिने मदतीसाठी हाका मारल्या पण तिच्या शेजाऱ्यांपैकी कुणीही मदतीसाठी आले नाही, असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
प्रकरणाचा बाऊ केला जातोय : नेटीझन्सचा आरोप
डिलिव्हरी बॉयने आपले म्हणणे मांडल्यानंतर नेटीझन्सनी या प्रकरणावरुन हितेशाला झापण्यास सुरुवात केली आहे. व्हीडिओद्वारे एखाद्याची बदनामी करून संकटात आणण्याचा प्रयत्न हितेशा करत आहे, असा टोला तिला लगावला जात आहे. हितेशाने पोलीसांत या प्रकरणी तक्रार नोंदवली होती. डिलिव्हरी बॉयवरही कारवाई झाली आहे.
झोमेटॉ संस्थापकांनी घेतली दखल
दीपिंदर गोयल हे झोमॅटो संस्थापक यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. कामराजला नोकरीवरून पुढील चौकशी होईपर्यंत कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही या प्रकरणात सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करू. आम्ही दोघांनाही मदत करणार आहोत. हितेशाच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी व कामराजवर झालेल्या कायदेशीर कारवाईचा खर्च आम्ही उचलणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पोलीसांनाही लागणारे सहकार्य यात करणार असल्याचे ते म्हणाले.
कामराजने पूर्ण केल्या ५ हजार डिलिव्हरी
खुद्द झोमॅटोचे संस्थापक यांनी कंपनीतर्फे कामराजच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. त्याने आजवरच्या सेवेत पाच हजार डिलिव्हरी पूर्ण केल्या आहेत. त्याच्या कामाचे रेटींग ४.७५/५ असे सर्वोत्तम रेटींग आहे. तो आमच्यासोबत २६ महिने सेवेत आहे. ही वस्तुनिष्ठ माहिती आम्ही देत आहोत. त्यात कुठलाही पूर्वग्रहदूषित नाही.