ठाणे शहरात आज ‘दुर्दम्य लोकमान्य’ लघुपटाचा प्रयोग

    27-Nov-2021
Total Views | 98

lokmany_1  H x




केवळ निमंत्रितांनाच प्रवेश !



ठाणे : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रगण्य नेते आणि आधुनिक लोकशाही राष्ट्रवादाचे प्रणेते निष्काम कर्मयोगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरील ‘दुर्दम्य लोकमान्य’ हा लघुपट ठाण्यातील मान्यवरांना दाखविण्याचा मानस आहे. सा. ‘विवेक’ समूह आणि ‘दै. मुंबई तरुण भारत’ निर्मित या लघुपटाचा प्रयोग फ़क्त निमंत्रितांसाठी शनिवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता ठाणे पश्चिमेकडील वागळे इस्टेट, रोड नं. १६ किसननगर येथील ‘सनराईज बिझनेस पार्क’ इमारतीतील ‘वास्तुरविराज ९०२'येथे आयोजित केला आहे.



अभिनेते विक्रम गोखले, प्रमोद पवार आणि अपर्णा चोथे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या लघुपटाची संहिता अंबरीश मिश्र यांची असून दिग्दर्शन विनोद पवार यांचे आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक आणि सा. ‘विवेक’ व ‘दै. मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर, महेश वैद्य आणि अतुल भिडे यांनी केले आहे.






 

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121