
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार असणावेदनशील आहे आणि सध्या होत असलेल्या आंदोलनाची राज्य सरकारने तावरीत दखल घ्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना ते म्हणाले, सरकारची भूमिका या संपाबाबत असंवेदनशील आहे. हा संप चिखलू नये अशी आमचीही इच्छा आहे. परंतु हे सरकार केवळ दमणशाहीच्या जोरावर, दडपण आणून लोकांवर वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करेल तर हे आंदोलन आणखी वाढेल. चर्चेतून मार्ग काढला पाहिजे आणि त्यातून काही ना काही दिलासा या कर्मचाऱ्यांना या सरकरने दिल्या पाहिजे, इतक्या आत्महत्या झाल्यानंतरही हे सरकार जाग होणार नसेल तर हे चुकीचं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आमचे गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील सगळे लोक आज आंदोलन करत आहेत. सरकारनं याची दखल घेतली पाहिजे. आम्हीही सरकारला पाहिजे तेवढं सहकार्य करू मात्र यातून मार्ग करून हा संप मिटविण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
विधानपरिषद निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले, विधानपरिषदेची निवडणूक घोषित झाली आहे. भाजपचे उमेदवार ठरविण्यासंदर्भाने आमची जे स्टेट इलेक्शन कमिटी आहे याची लवकरच बैठक घेऊ आणि त्यात उमेदवार कोण असतील हे ठरवून तशी शिफारस केंद्राच्या कमिटीला पाठवून आमच्या पार्लिमेंट्री बोर्ड आणि अध्यक्ष त्याला मान्यता देतील.
नवाब मालिकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलारांनी दिलेल्या प्रतिक्रियाही पुरेश्या बोलक्या आहेत. त्यामुळे नवाब मालिकांच्या बोलण्याला काहीही वजन नाही उगाच कशाला वजन देताय, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.