विनाकारण बदनामीचा डाव ; पँडोरा प्रकरणात सचिनचे स्पष्टीकरण

पँडोरा प्रकरणात सचिन तेंडूलकरवर गुप्त गुंतवणूक करून कर चुकवल्याचा आरोप

    04-Oct-2021
Total Views | 133

Sachin Tendulkar_1 &
मुंबई : इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) यांच्या उडाली. पँडोरा पेपर्स नावाने लीक झालेल्या कागदपत्रात जगभरातील अनेक नामांकित व्यक्तिंसह भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. या पँडोरा प्रकरणात भारतासह ९० देशांच्या जागतिक नेत्यांवर आणि राजकारण्यांवर हे आरोप करण्यात आले आहे. यावर आता सचिन तेंडूलकरकडून स्पष्टीकरण आले असून, विनाकारण बदनाम केले जात असल्याचे त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आले आहे.
 
 
 
सचिन तेंडूलकरच्या वकिलांनी सांगितले की, "सचिनची सर्व गुंतवणूक कायदेशीर असून आयकर अधिकाऱ्यांकडे त्याची माहिती आहे. या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. सचिनचे नाव विनाकारण बदनाम केले जाते आहे. जगभरात सचिनची प्रतिमा एक स्वच्छ आणि प्रामाणिक क्रिकेटपटू अशी आहे. मैदान आणि मैदानाच्या बाहेर सचिन कोणत्याही वादात नव्हता. क्रिकेटच्या मैदानावर छोटे-मोठे वाद होतच असता. पण क्रिकेटपटू म्हणून सक्रीय असताना तो वादापासून दूर होता. सचिन वादग्रस्त वक्तव्यापासून लांबच राहतो."
 
 
पँडोरा पेपरमध्ये सचिन तेंडूलकरवर केले गेले 'हे' आरोप
 
 
आयसीआयजेने या जागतिक पातळीवरील पत्रकारांच्या समूहाने गेल्या वर्षभरात विशेष शोध मोहीम राबवली होती. यामध्ये जगभरातील श्रीमंतांनी कर प्रणालीतून पळवाट शोधून स्वत:ची संपत्ती सुरक्षित ठिकाणी लपवण्याचा धक्कादायक प्रकार केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक भारतीयांसह ३५ जागतिक नेते, ३३०हून अधिक राजकारणी आणि ९१ देश-प्रदेशातील सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये ३०० भारतीयांची नावे समोर आली असून सचिन तेंडूलकरच्या नावाचादेखील समावेश आहे. या पेपर्समध्ये सचिनने विदेशात संपत्ती ठेवल्याचा दावा केला आहे. मात्र, हे सर्व दावे सचिनकडून फेटाळण्यात आले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121