डोंबिवली : एका इमारत बांधकाम व्यावसायिकांनी सांडपाणी सोडविण्यासाठी अनधिकृत गटार तयार केले आहे. हे गटार अरूंद असल्याने त्यातून पहाटे आणि रात्रीच्या वेळी पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे रस्ता पूर्णपणो खड्डेमय झाला आहे. रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त असून वाहतूक कोंडीची समस्यादेखील वाढण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती मनोज देसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय देसले यांनी दिली आहे.
डोंबिवली पूर्व येथील शनिमंदीर रोडजवळ एका विकासकाने मोठी इमारत बांधण्यास सुरूवात केली आहे. गेल्या चार महिन्यापासून या विकासकाने सांडपाणी रस्त्यावर सोडण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी परिसरातील नागरिकांना आरडाओरडा सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी अनोखी शक्कल लढवत अनधिकृत गटार तयार केले. यासाठी महापालिकेची परवानगी घेतली नाही. विशेष म्हणजे यामुळे या परिसरातील रस्त्याची पूर्णपणो चाळण झाली आहे. खडी, रेती या परिसरात इतरत्र पसरली आहे. परिसरात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरात दोन शाळा असून मुख्य रस्त्यावर येणारा हा एक मार्ग आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात अपघात होण्याची देखील दाट शक्यता आहे. या संदर्भात संजय देसले यांनी चार महिन्यापूर्वी ई प्रभाग अध्यक्षांना एक पत्र देखील दिले आहे. मात्र अद्याप त्यावर कोणतेची कारवाई झाली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
------------------------------
---------------------------------