मुंबई: आमदार पराग शाह यांच्यामार्फत घाटकोपर मधील हजारो नागरीकांना प्रथमोपचार कीटचे मोफत वाटप भारताचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सेवा व समर्पण अभियानाच्या अंतर्गत घाटकोपर पूर्व विधानसभेत खासदार मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार पराग शाह यांच्या मार्फत नागरिकांना करण्यात आले आहेत.
घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांच्या मार्फत विधानसभेत असलेल्या १२५,१३०,१३१,१३२,१३३ या सर्व ५ प्रभागात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हजारोंच्या संख्येने गरीब गरजू लोकांना प्रथमोपचार कीटचे वाटप करण्यात आले. या प्रथमोपचार कीटमध्ये १० प्रकारचे औषधे व साहित्य दिले आहेत. त्यात जखम झाल्यास साफ करण्याकरिता हायड्रोजन पेरॉक्साइड, अँटीसेप्टिक लोशन सोबत कॉटन रोल व जखमेवर लावण्याकरिता सिप्लाडाइन मलम व बँडएड पट्टी, वातावरणाच्या बदलामुळे अंगात कणकणी अथवा ताप आल्यास त्यासाठी औषध, पोटदुखीवरचे औषध, सर्दी करिता औषध अशा विवध प्रकारच्या औषधांचा डब्बा नागरिकांना मोफत देण्यात आला. या अगोदरही आमदारांनी त्यांच्या प्रभागात कोरोना काळात वेळोवेळी गरीब गरजू नागरिकांना मोफत धान्य वाटप, मोफत औषधे वाटप व मोठ्या जटील शस्त्रक्रियेसाठी स्वतःकडुन अर्थ सहाय्य करत आले आहेत. कोरोना रुग्णांसाठी घाटकोपर पूर्व मध्ये कोरोना सेंटर सुरु केले होते. त्यासाठी त्यांचे नागरिकांनी भरभरून कौतुकही केले. सेवा परमोधर्म ह्या मुळ तत्वावर आमदार व त्यांचे सहकारी काम करत असतात. तसेच येणाऱ्या काळात अशाप्रकारे विविध लोकोपयोगी कार्यक्रम नागरिकांकरिता घेण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक, आमदार पराग शाह, जिल्हाध्यक्ष अशोक राय, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, मंडळ अध्यक्ष रवी पूज, जिल्हा प्रबंधक विकास कामत, महिला मंडळ अध्यक्ष दिपालीताई शिरसाट, युवा अध्यक्ष प्रशांत शेट्टी, सर्व वार्ड अध्यक्ष आदी मान्यवर व सर्व भाजप पदाधिकारी, महिला मोर्चा आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रधानमंत्री 'सेवायज्ञ' जो १६ सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. त्याअनुषंगाने घाटकोपरमधील सर्व प्रभागात प्रथमोपचार पेटीचे वाटप केले. सर्व गोरगरिबांना चांगल्या दर्जाची औषधे-गोळ्यांचे वाटप यातून करण्यात आले. दर महिन्यात आम्ही नवनवीन उपक्रम राबवणार आहोत त्याचाच हा एक भाग आहे. मला आनंद आहे की घाटकोपर मधील जनता आंनदाने आमच्या सोबत उभी आहे.
- पराग शाह, आमदार भाजप