नवी दिल्ली : लसीकरणात देशात ९६.७५ कोटींपेक्षा जास्त मात्रा पूर्ण झाले असून आता लवकरच शंभर कोटींचा टप्पा पार होणार आहे. केंद्र सरकार यानिमित्त कोविड योद्ध्यांचा सन्मान करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भारतातील लसीकरणाच्या मात्रांमध्ये शंभर कोटीच्या लसीकरणाचा पल्ला लक्षात घेता ही मोठी उपलब्धता मानली जात आहे. त्यामुळे याचे दायित्व म्हणून केंद्र सरकार कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार आहे.
दसऱ्यानंतर येणार लसीकरणाला वेग!
शंभर कोटींचा लसीकरणाचा टप्पा पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवरात्र आणि दसऱ्यानिमित्त काही लसीकरण केंद्र बंद असल्याने ही प्रक्रीया मंदावली होती. मात्र, यानंतर लगेचच प्रक्रीया वेगवान होणार आहे. त्यामुळे शंभर कोटींचा हा आकडा लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान
मंत्री आणि खासदार लसीकरण केंद्रावरील कोरोना योद्ध्यांचा सन्मान होणार आहे. तसेच यानंतर इतर कल्याणकारी योजनांची घोषणा केली जाणार आहे.
२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाले ९० कोटी लसीकरण
२ ऑक्टोबरपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देशातील कोरोना लसीकरणाच्या ९० कोटी मात्रा पूर्ण केल्या होत्या. ते म्हणाले होते की, लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान-जय किसानचा नारा दिला होता, अटलजींनी त्यात विज्ञान जोडला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यात संशोधन जोडले आहे.