'पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर'चे देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

    04-Jan-2021
Total Views | 97


PARC_1  H x W:



मुंबई : विविध विषयांवर सखोल संशोधन करून विशेष अहवाल तयार करणार्‍या सा. ‘विवेक’ व्यासपीठ संचलित ‘पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर’च्या (पार्क) कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवार,४ जानेवारी रोजी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. वडाळा येथील जी.डी.आंबेकर मार्गावरील शिल्पीन सेंटरमध्ये दुसर्‍या मजल्यावर ‘पार्क’च्या कार्यालयामध्ये आज दुपारी हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121