अखेर तांडवच्या निर्मात्यांची माघार ; 'त्या' दृश्याबद्दल मागितली माफी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jan-2021
Total Views |

Tandav_1  H x W
मुंबई : देशभरामध्ये अॅमेझोन प्राईमच्या 'तांडव' या वेब सिरीजवरून मोठा गदारोळ झाला. यामध्ये हिंदू देवी-देवतांवर केलेल्या टिप्पणीप्रकरणी निर्मार्ते, कलाकार, तसेच लेखकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर आता वेब सिरीजच्या निर्मात्यांनी माफी मागितली असून ते दृश्य काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, जोपर्यंत हे दृश्य निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालूच राहणार असेदेखील भाजप आमदार राम कदम यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
 
 
 
'तांडव' ही वेब सिरीज शुक्रवारी रिलीज झाल्यापासूनच यामध्ये हिंदू देवी- देवतांचा अपमान किंवा विडंबना केली आहे, असा आरोप लावला जात आहे. एरवी वेब सिरीज मधली आक्षेपार्ह दृश्य वगळा किंवा ठराविक शब्दांसाठी बीप लावा अशा पद्धतीने विरोध होतोच. पण यावेळी मात्र वेब सिरीज थेट बॅन करा, अशीच मागणी टीका करणाऱ्यांनी सुरु केली आहे. आणि यामध्ये अनेक संघटनांसह भाजप नेत्यांचाही समावेश आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@