हिंदूंच्या भावना दुखावल्याने 'तांडव' वेबसिरीज वादात !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2021
Total Views |

Tandav - Web Series_1&nbs
 
मुंबई : सध्या अॅमेझोन प्राईमवर प्रदर्शित झालेली सैफ अली खानची 'तांडव' ही वेबसिरीज वादाच्या भवऱ्यात सापडली आहे. सोशल मिडीयावर या वेब सिरीजमध्ये हिंदूंच्या भावना दुखावणारे दृश्य दाखवण्यात आले असून या वेब सिरीजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. एका राजकीय नेत्याच्या आयुष्यावर आधारित ही 'तांडव' वेबसिरीज आहे. तांडव वेबसिरीजमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. तांडव ही वेबसिरीज अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे.
 
 
 
 
काही लोकांनी या वेबसिरीजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या सिरीजमधल्या एका सीनमध्ये अभिनेता मोहम्मद जीशान अयूब हा भगवान शंकराच्या वेषात दिसत आहे. त्या सिनमध्ये भगवान श्री राम व शिव शंकरावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या गोष्टीवरुन चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषत: हिंदू संघटनांना या वेबसिरीजवर भडकल्या असून तांडवच्या निर्मात्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@