राम भक्तांचे स्वप्न साकार होताना पाहून पडद्यावरचे ‘राम’ झाले आनंदी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2020
Total Views |
Arun govil_1  H

आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाणार; अरुण गोविल यांची प्रतिक्रिया

मुंबई : 'सिया राममय सब जग जानी करहुं प्रनाम जोरि जुग पानी... 'अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला आहे. लाडक्या रामललासाठी अयोध्या नगरी सजली असून देशभरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. छोट्या पडद्यावरील गाजलेल्या 'रामायण' या मालिकेत रामाची भूमिका वठवणारे कलाकार अरुण गोविल यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला आहे.


अरुण गोविल यांनी भगवान राम यांच्या मंदिराची पायाभरणी आणि भूमिपूजनाबद्दल आनंद व्यक्त करणारे ट्विट केले आहेत. ते म्हणतात, सर्वजण भगवान श्री राम यांच्या मंदिराच्या पायाभरणीची वाट बघत आहेत. अयोध्येत भूमिपूजनाने दिव्य युगाची सुरुवात होईल.







आपल्या आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिला जाणार आहे.








@@AUTHORINFO_V1@@