मृत्युनंतर पहिल्यांदाच समोर आली सुशांतच्या डायरीची पाने!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Aug-2020
Total Views |
sushant_1  H x

सुशांतने केले होते भविष्याचे नियोजन!


मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन नवीन वळण घेत असून, नव्या गोष्टींचा उलगडा होत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या तब्बल दीड महिन्याने त्याच्या डायरीतील १५ पाने आज समोर आली आहेत. यामध्ये सुशांतने हॉलिवूड पदार्पणापासून कंपनीच्या भविष्यातील वाटचालींचे नियोजन केल्याचे दिसत आहे. बहीण प्रियांका आणि गर्लफ्रेंड रिया यांचाही उल्लेख सुशांतने आपल्या या डायरीत केला होता.


सुशांतच्या या डायरीत त्याने कुटुंबापासून दुर होत चालल्याचे नमूद केले आहे. कुटुंबातील दुरावा वाढू नये यासाठी २०२०च्या नियोजनात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचे त्याने ठरवले होते. कुटुंबातील कुणाचीही साथ सुटणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे त्याने लिहिले होते. सुशांत त्याच्या कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देऊ इच्छित होता.


पुढे सुशांतने आपल्या डायरीत त्याची बहीण प्रियांका आपल्या टीमला हँडल करेल असे लिहिले आहे. आपल्या करिअरमध्ये कुटुंबीय आपल्याला साथ देऊ शकतात अस विश्वास त्याला होता. आपली अभिनय कारकीर्द सावरण्यासाठी काय करता येईल, याबाबतही सुशांतने विचार करुन ठेवला होता. यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचाही त्याने विचार केला होता.

सुशांतने एका पानावर त्याच्यावर होत असलेल्या आरोपांवर चिंता व्यक्त केली आणि रियाच्या नावाचा उल्लेख केला आहे. या पानावर सुशांतने लाल शाहीने N या कोडनेमने लिहिले - मला स्वतःबद्दल, कुटूंबाबद्दल विचार करण्याची इच्छा आहे. कोणालाही गमावू इच्छित नाही. संरक्षणात्मक, काळजी घेणारी आणि समजूतदार व्हायची माझी इच्छा आहे. मुक्कू माझ्या गरजा पूर्ण करते, असेही त्याने यात लिहिले आहे.


एखादा सीन उठावदार होण्यासाठी कोणता प्रयोग आणि कोणती पद्धत वापरली पाहिजे, त्याची तयारी कशी करावी, याविषयी सुशांतने लिहिले आहे. सुशांत पुढे लिहितो, आपल्याला दिलेल्या ओळी वा वाक्य पाठ करू नका..ती वाक्य अनुभवा..आणि त्यानंतर कॅमेऱ्यासमोर व्यक्त व्हा..! यावरूच सुशांत आपल्या अभिनायाप्रती किती प्रामाणिक होता, भूमिकेसाठीची त्याची मेहनत दिसून येते.


सुशांत चांगल्या लेखकांच्या माध्यमातून चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होता. त्यामुळेच तो आपली टीम बनवण्यासोबतच लेखकांची लीग तयार करण्याच्याही विचारात होता. जेणेकरुन चांगले लेखन करणारे पटकथाकार आणि त्यांच्या स्क्रिप्ट कोणालाही उपलब्ध होतील. त्याचबरोबर हॉलिवूडमध्ये काम, स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, कंपनीत कुटुंबातील कोणत्या सदस्याला काय जबाबदारी द्यायची, कंपनीला कोणत्या शिखरावर न्यायचं, याबाबतही नियोजन करून त्याचा आराखडा सुशांतने आपल्या डायरीत लिहून ठेवला असल्याचे दिसते.



@@AUTHORINFO_V1@@