कोरोनाशी लढण्यासाठी मोदींचा मास्टर प्लॅन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jul-2020
Total Views |

narendra modi_1 &nbs



नवी दिल्ली :
देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधानांनी एक महत्वपूर्ण घोषणा आलेली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हाय थ्रोपुट कोविड १९' (High Throughput COVID-19)चाचणी उपक्रम जाहीर करणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.



या सुविधांमुळे देशातील चाचणी क्षमता वाढेल आणि लवकर निदान व उपचार बळकट होण्यास मदत होईल आणि त्यामुळे इतर साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होईल अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. उद्या सोमवार दि.२७ जुलै रोजी सायंकाळी साडेचार वाजता हा उपक्रम लॉन्च करण्यात येईल. ही चाचणी सुविधा आयसीएमआर-नॅशनल कर्करोग प्रतिबंध व संशोधन संस्था,नोएडा;आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिसर्च इन रीप्रोडक्टिव्ह हेल्थ, मुंबई आणि आयसीएमआर-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॉलरा अ‍ॅन्ड एंटरिक रोग, कोलकाता या प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार आहे.







या उपक्रम अंतर्गत एका दिवसात १०,००० पेक्षा जास्त नमुने तपासणे शक्य होईल. या लॅब्स कोविड व्यतिरिक्त इतर रोगांची तपासणी करण्यास सक्षम आहेत. हेपेटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, मायक्रो बॅक्टोरियम क्षयरोग, सायटोमेगाल व्हायरस, क्लेमिडिया, निसेरिया, डेंग्यू इत्यादीची चाचणी घेण्यास सक्षम असतील. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांच्यासह महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतील.

@@AUTHORINFO_V1@@