धारावी नियंत्रणात; मात्र उपनगरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट!

    23-Jul-2020
Total Views | 38

Corona_1  H x W


जोगेश्वरी, अंधेरी पूर्व विभाग ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

मुंबई : कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत पूर्व विभागाने मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या धारावीलाही मागे टाकले आहे. जोगेश्वरी, अंधेरी पूर्व परिसरात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढून सध्या ६७८१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईत सर्वाधिक ४३१ मृत्यू या विभागात झाले आहेत.


अंधेरी भागात सेव्हन हिल्स रुग्णालय आणि जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण उपचारांसाठी येतात. मुंबईतील आतापर्यंत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक लाख तीन हजार २६२ वर पोहोचला आहे. यापैकी ७२ हजार ७९४ रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.


मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात दिसून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, वडाळा या शहर भागात रुग्णांचे प्रमाण अधिक होते. या हॉटस्पॉटमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान असल्याने पालिकेने या भागांना प्राधान्य देत काम सुरु केले. या काळात कोरोनाचा प्रसार पश्चिम उपनगरात वाढू लागला. अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी कर्मचारी पूर्व विभागात राहत असल्याने रुग्णांची संख्या वाढत गेली.


जोगेश्वरी, अंधेरी पूर्व या परिसराची लोकसंख्या सुमारे साडेआठ लाख एवढी आहे. मरोळमध्ये सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ३ जूनपासून लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर के पूर्व विभागातील व्यावसायिक आणि औद्योगिक वसाहती, विमानतळ, मोठे हॉटेल्स, एमआयडीसीमधील व्यवहारही सुरू झाल्याने कोरोनाचा प्रसार वाढला. मुंबई महापालिकेने ‘मिशन झीरो’ मोहीम सुरू केल्यानंतर या विभागातील रुग्णसंख्या आता ७१ दिवसांनंतर दुप्पट होतेय. १४ ते २१ जुलै या कालावधीत के पूर्व विभागात ४४६ रुग्णांची नोंद झाली आहे.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121