
ह्रितिक रोशन आणि आलिया भट्ट यांना खास जबाबदारी सोपविण्याचा निर्णय!
मुंबई : ऑस्कर अवॉर्ड आयोजित करणाऱ्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सने ह्रितिक रोशन आणि आलिया भट्ट यांना यंदा खास जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीने बॉलिवूडच्या दोन्ही स्टार्सना आमंत्रणे पाठविली आहेत. जेव्हापासून ही बातमी समोर आली आहे तेव्हापासून चाहते सतत सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत.
चित्रपट दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी ही माहिती देत आणि दोन्ही कलाकारांचे अभिनंदन केले. ट्विट करताना मिलाप यांनी लिहिले की, ‘ह्रितिक आणि आलिया उत्कृष्ट कलाकार आणि सक्षम निर्णायक आहेत. अकादमीशी त्यांचा संबंध खूप मोठा आहे. आता हृतीक आणि आलियाने ही ऑफर स्वीकारल्यास दोघांनाही ऑस्कर पुरस्कारासाठी मतदानाचा हक्क मिळेल.’
ह्रितिक आणि आलियाबरोबर डॉक्युमेंटरी चित्रपट निर्माते निष्ठा जैन आणि अमित माधेशिया, डिझायनर नीता लुला, कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत, व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर विशाल आनंद आणि संदीप कमल या ८१९ जणांना अकादमीने आमंत्रित केले आहे.
ह्रितिक आणि आलियाने या निमंत्रणाचे स्वीकार केल्यास त्यांना २५ एप्रिल २०२१ रोजी होणाऱ्या ९३ व्या अकादमी अवॉर्डसाठी वोट करण्याचा अधिकार मिळणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी होणारा हा सोहळा यंदा कोरोना संकटामुळे २५ एप्रिल २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.