प्रभु, आपने कभी बताया नहीं कि आप नेपाली हो! : दीपिका चिखलिया

    18-Jul-2020
Total Views | 84

dipika_1  H x W


मीम शेअर करत ‘रामायणा’च्या सीतेचा नेपाळच्या पंतप्रधानांना टोला!

मुंबई : प्रभू रामचंद्र नेपाळी असून, खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचा अजब दावा नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली शर्मा यांनी नुकताच केला होता. त्यांच्या या अजब वक्तव्याचा सगळ्यांची आपापल्या पद्धतीने समाचार घेतला. दूरदर्शनच्या गाजलेल्या ‘रामायण’ मालिकेत माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी ‘प्रभु, आपने कभी बताया नहीं कि आप नेपाली हो!’ अशी खुमासदार पोस्ट केली आहे.







या पोस्टमध्ये दीपिका चिखलिया यांनी रामायण मालिकेतला एक फोटो मीम ट्विट केला आहे. या फोटोत प्रभू रामचंद्र (अरुण गोविल), लक्ष्मण (सुनील लहरी) आणि हनुमान (दारासिंग) दिसत आहेत. त्या फोटोवर ‘प्रभु, आपने कभी बताया नहीं आप नेपाली हो!’ असा संवाद दिसत आहे. ‘ही गोष्ट ऐकून हनुमानालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे’, असे कॅप्शन देत दीपिका यांनी हे मीम शेअर करत ओली यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे.









अग्रलेख
जरुर वाचा
वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

वन आणि वन्यजीवांविषयी शिकण्याचा प्रयत्न करा : मंत्री आशिष शेलार

‘व्हीपीएफ’च्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे शेलार यांच्या हस्ते उद्घाटन; वनविभागासोबतचा संयुक्त प्रकल्प ‘विवेक पार्क फाऊंडेशन’ने (व्हीपीएफ) बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सहयोगाने राबविलेल्या गवताळ अधिवास पुनरुज्जीवन प्रकल्पाचे रविवार, दि. १३ जुलै रोजी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी, ‘एसएफसी इन्व्हार्यमेंटल टेनोलॉजीज’ चे सहसंस्थापक व संचालक संदीप परब हेदेखील उपस्थित असेल. या प्रकल्पाचे कौतुक करत असतानाच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121