सांताक्रूझमध्ये इमारतीचा भाग कोसळला! नजीकच्या घरांचे नुकसान

    03-Jun-2020
Total Views | 111

1_1  H x W: 0 x



इमारतीजवळील चाळीतील रहिवाशांचे ऐन पावसात हाल !


मुंबई : महाराष्ट्राच्या दिशेने येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. या वादळामुले राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. झाले उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान मुंबईतील वाकोला भागातही या वादळाने आपले रौद्र रूप दाखवले आहे. या भागातील बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा काही भाग इमारती खालील चाळींवर पडल्याने ऐन पावसात रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले आहे. घरांचे पत्रे तुटून डेब्रिज लोकांच्या घरात पडले आहे.


सांताक्रूझ-वाकोला ब्रिज परिसरातील डवरी नगर विभागात चैतन्य कॉलनी येथे नविन बांधत असलेल्या RNAच्या बिल्डिंगचे शेवटच्या मजल्यावरील काही भाग काही झोपड्यांवर कोसळले. त्यामुळे तेथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या दरम्यान मुंबई आणि इतर किनारपट्टीलगत भागांमध्ये ताशी १०० ते ११० किमी वेगाने वारे वाहणार आहेत.



रहिवाश्यांच्या घरात कोसळला इमारतीचा भाग


1_1  H x W: 0 x


घराचे छत तुटल्याने घरात शिरले पावसाचे पाणी


२_1  H x W: 0 x



घटनास्थळी पोलीस दाखल


३_1  H x W: 0 x
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121