‘डब्लूएचओ’ने लडाख दाखवले चीनमध्ये, तर जम्मूचा काही भाग पाकिस्तानात दाखवला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2020
Total Views |

WHO CHina_1  H
 
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने लडाखला चीनचा भाग दाखवत भारताच्या नकाशासोबत पुन्हा एकदा छेडछाड केली आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर संपूर्ण अक्साई हा चीनचा भाग म्हणून दाखविण्यात आला आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख हा संपूर्णपणे भारताचा भाग आहे आणि हे दोन स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश आहेत. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या काही भागात पाकिस्तान आणि चीनचा अवैध कब्जा होता. त्यामुळे पुन्हा एकदा डब्लूएचओवर चीनने पट्टी बांधली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
 
एकीकडे कोरोनाच्या प्रर्श्वभूमीवर डब्लूएचओ अनेक उपक्रम राबवत असताना अनेक कारणांमुळे वधाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यापूर्वी संयुक्त राष्ट्राच्या अनेक नकाशांमध्ये जम्मू काश्मीरलाही 'विवादित प्रदेश' म्हणून ठेवण्यात आले आहे. पहिल्यांदाच या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळ्या रंगाचे चित्रण देण्यात आले आहे आणि उर्वरित भारताचा नकाशा वेगळ्या रंगाचा आहे. भारत, पाकिस्तान आणि भूतानचे भारतीय राजदूत राहिलेले गौतम बंबवले म्हणाले की, डब्ल्यूएचओने भारताचा नकाशा दर्शविला आहे तो संयुक्त राष्ट्रांच्या मानक नकाशापेक्षा अगदी वेगळा आहे.
@@AUTHORINFO_V1@@