कोरोना तपासणी किट तयार केल्यानंतर तिने दिला बाळाला जन्म

    28-Mar-2020
Total Views | 125
minal bhosale_1 &nbs

राष्ट्रसेवा म्हणून कर्तव्य बजावल्याची भावना

मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना व्हायसरच्या तपासणीचे पहिले मेड इन इंडिया किट गुरुवारी बाजारात उपलब्ध झाले. हे किट तयार करण्याच्या दुसऱ्याच दिवशी मीनल डाखवे भोसले यांना मातृ्त्वसुख लाभले. हे किट तयार करणाऱ्या टीमच्या मीनल या प्रमुख आहेत. अशा कठीण परिस्थितीत राष्ट्रसेवा म्हणून मी माझे कर्तव्य बजावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
पुण्यातील 'मायलॅब डिस्कवरी' ही कोरोनाच्या तपासणीचे किट तयार करुन त्याची विक्री करण्यास मान्यता मिळालेली भारतातील पहिली फर्म ठरली आहे. या आठवड्यात या किटची पहिली तुकडी पुणे, मुंबई, बंगळूरू आणि गोव्याला पाठवण्यात आली. पंरतु, हे किट तयार करणाच्या दुसऱ्याच दिवशी ते तयार करण्यामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या मीनल डाखवे भोसले यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. १८ मार्च रोजी त्यांनी हे किट 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी'ला (एनआयव्ही) मूल्यांकनासाठी सादर केले आणि १९ मार्च रोजी बाळाला जन्म दिला. फेब्रुवारी महिन्यात १० सदस्यांसोबत त्यांनी या किटच्या निर्मिती कामाला सुरुवात केली होती. प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल होईपर्यंत त्या किटवर काम करत होत्या.
 
 
मायलॅब डिस्कवरी यांनी तयार केलेले हे किट अडीज तासांमध्ये कोरोनाचे निदान करते. याउलट परदेशातून आयात केलेले किट यासाठी सहा ते सात तासांचा कालावधी घेतात. महत्त्वाचे म्हणजे, 'पाथो डिटेक्ट' नावाचे हे किट तीन ते चार महिन्यांच्या ऐवजी सहा आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात आले. हे किट १०० नमुन्यांची चाचणी करु शकते आणि केवळ १,२०० रुपयांना विकत मिळते. उलटपक्षी परदेशातून आयात केलेल्या किटची किमंत ४,५०० रुपये आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121