निर्भया बलात्कारातील दोषींची फाशी निश्चित ; उद्या फाशी होणार?

    02-Mar-2020
Total Views | 86

supreme court nirbhaya ca
 
 
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी जवळपास निश्चित झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणातील दोषी पवन कुमार गुप्ता याची क्यूरेटिव याचिका फेटाळली. ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. दोषी पवनकडून फाशीच्या शिक्षेला उशीर व्हावा या उद्देशानेच संबंधित याचिका दाखल केल्याचा त्याच्यावर आरोप झाला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून फाशीच्या अंमलबजावणीचा मार्ग जवळपास मोकळा केला आहे.
 
 
दरम्यान, निर्भया प्रकरणातील दोषींना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने १७ फेब्रुवारीला ही तारीख जाहीर केली होती. त्यापूर्वी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता सर्व अडथळे दूर झाले असून ठरल्याप्रमाणे ३ मार्चलाच दासी होणार का? की तारीख आणखी पुढे जाणार असा प्रश्न विचारला जात आहे.
 
 
२०१२च्या डिसेंबरमध्ये एका २३ वर्षीय निर्भयावर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी ११ मार्च २०१३मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121