बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टला राम राम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |
bill gates_1  H

आता पूर्णवेळ समाजकार्य करण्याचा मानस!


मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. मायक्रोसॉफ्टसचे सहसंस्थापक असलेले गेट्स २००८ सालापासूनच कंपनीच्या दैनंदिन कामातून बाजूला झाले होते. आता ते पूर्णपणे कंपनीतून बाहेर पडले आहेत. मायक्रोसॉफ्टसह बिल गेट्स 'बर्कशायर हाथवे'तूनही बाहेर पडले आहेत. वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीत ते संचालक पदावर होते. बर्कशायर हाथवेच्या संचालकपदावर ते २००४ सालापासून कार्यरत होते. ‘मायक्रोसॉफ्टचं माझ्या आयुष्यातील महत्त्व कायमच मोठं राहिलंय’, अशा भावना बिल गेट्स यांनी यावेळी व्यक्त केल्या. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक, यशस्वी उद्योगपती आणि सामाजिक कामे यामुळे बिल गेट्स कायमच चर्चेत असतात. जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स हे दुसऱ्या स्थानावर आहेत.


बिल गेट्स यांनी न्यू मेक्सिकोतील आल्बुकर्की शहरात बालपणीचा मित्र पॉल अॅलन यांच्या सोबतीने मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. पॉल अॅलन यांचे २०१८ साली निधन झाले. १९८० मध्ये मायक्रोसॉफ्टने आयबीएम कंपनीसोबत ऑपरेटिंग सिस्टम बनवण्यासाठी करार केला. यामुळे मायक्रोसॉफ्टला खरी ओळख मिळाली. MS-DOS नावाची ऑपरेटिंग सिस्टम आयबीएमच्या मदतीने मायक्रोसॉफ्टने तयार केली.


'आता सामाजकार्य करणार'

बिल गेट्स जगभर फिरून गेट्स फाऊंडेशनचे काम करतात. पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या मदतीने त्यांनी या फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या कामाला बिल गेट्स गेल्या काही वर्षांपासून खूप वेळ देताना दिसतात. द क्रोनिकल ऑफ फिलान्थ्रॉपीने २०१८ साली गेट्स दाम्पत्याला अमेरिकेतील सर्वात दानशूर समाजसेवी म्हणून गौरवले होते. गेल्याच वर्षी गेट्स दाम्पत्याने ४.८ बिलियन डॉलर इतकी संपत्ती सामाजिक कामासाठी दान केली होती. मायक्रोसॉफ्ट आणि बर्कशायर हाथवे या दोन्ही कंपन्यांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाल्यानंतर बिल गेट्स यांनी पूर्णवेळ समाजकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य, शिक्षण आणि हवामान बदल या विषयात काम करण्याची इच्छा बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@