मुंबई ‘आय’साठी वांद्रे रेक्लेमेशनचा हट्ट का? : आशिष शेलार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Mar-2020
Total Views |

ashish shelar_1 &nbs
मुंबई : नॅशनल बिल्डिंग कोड प्रमाणे 'मुंबई आय'साठी १४ एकर जागा अपेक्षित असताना १ एकर मध्ये करण्याचा हट्ट सरकार का करते आहे. त्यासाठी आवश्यक असणारी जागा वांद्रे रेक्लेमेशन येथे उपलब्ध नसताना मुंबई आय वांद्रे रेक्लेमेशनलाच करण्याचा हट्ट का? आधीच वहातुक कोंडीने गुदमरलेल्या वांद्रेकरांना अजून का मारताय? 'नाईट लाईफ' च्या नावावर कमला मिल मधील एफएसआय घोटाळा नियमित करण्याचा डाव तर नाही ना? या दोन्ही योजना म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने तर नाहीत ना ? असे सवाल भाजपा नेते अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केले.
 
 
विधानसभेत आज पर्यटन आणि शिक्षण या दोन विभागांवर बोलताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील २ महत्वाचे आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधले. पर्यटन विभागातर्फे मुंबईत २ नव्या संकल्पना मांडण्यात आल्या असून त्यातील नाईट लाईफची अंमलबजावणी सुरु झाली आहे. ज्या कमला मिलमध्ये नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. त्या कमाल मिल मध्ये एफएसआयचा मोठा घोटाळा झाला, हे आता चौकशी अंती उघड झाले आहे. महापालिकेने केलेल्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, एकूण ९५,२८१ चौ. मी. एफएसआय पैकी २२,६५८ चौ. मी. म्हणजेच अडीच लाख फुट अनधिकृत बांधकाम असून, यापैकी ११,३६२ चौ.मी. म्हणजे सुमारे सव्वा लाख फुट एफएसआय अग्नीसुरेक्षेसाठी होता, त्यातील अग्नी सुरक्षेसाठी असलेल्या जागेचाही गैरवापर करण्यात आला आहे. ज्या कमाला मिल मध्ये दोन पबला २ वर्षा पूर्वी लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेला त्या कमला मिल मध्ये पुन्हा नाईट लाईफ म्हणून मुंबईकरांचा जीव धोक्यात का घालत आहात. १८ जानेवारी २०२० ला नाईट लाईफची भाषणे करण्यात आली आणि ११ जानेवारीला हा चौकशीचा अहवाल समोर आला. त्यामुळे एकट्या कमला मिल मध्येच फक्त नाईट लाईफ सुरु करून पर्यटनाच्या नावावर अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचा तर प्रयत्न नाही ना, असा सवाल शेलार यांनी केला.
 
 
मुंबई आय उभारण्याची योजना चांगली आहे. पण त्यासाठी वांद्रे रेक्लेमेशनचा हट्ट का? तेथे असणाऱ्या अपुऱ्या जागेत मुंबई आय उभारण्यात येणार नाही म्हणून या प्रकल्पाच्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तरीही वांद्रे रेक्लेमेशनचा हट्ट का? लंडन ‘आय’ आणि जगभरातील अशा अन्य प्रकल्पांचा विचार केला तर अशा प्रकल्पांना एका वर्षात ७ मिलियन लोक भेट देतात. त्यासाठी नॅशनल बिल्डींग कोड प्रमाणे ७६७ शौचालये १२०० मुताऱ्या, २००० गाड्यांचे पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी सुमारे १४.२२ एकर जागा अपेक्षित होती. वांद्रे रिक्लेमेशन येथे केवळ १ एकर जागा उपलब्ध आहे. या जागेत हे सर्व कसे बसविणार? वांद्रे वरळी सेतू परिसर हा नेहमी गजबजलेला असून आता या परिसरातील हॉटेल व हॉस्पिटल मुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे. भविष्यात आणखी एक फाईव्ह स्टार हॉटेल येऊ घातले आहे. त्यामुळे वांद्रे रेक्लेमेशन ला मुंबई आय उभारून प्रचंड वाहतूक कोंडी होइल, म्हणून या 'मुंबई आय'ला वांद्रेकरांचा विरोध आहे. असे असताना सरकार हे दोन्ही प्रकल्पांचा हट्ट करते आहे. याचा अर्थ हे प्रकल्प करायचेच नाही का, असा थेट सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला. दरम्यान शिक्षण विभागावर बोलताना मराठी माध्यमाच्या शाळा व अनुदानित शाळा यांना ५ दिवसांचा आठवडा करा, संच मान्यतेचे निकष बदला, शिक्षकांना बाल संगोपनाची रजा १८० दिवस देण्याचा निर्णय भाजप सरकारच्या काळात झाला त्याची अमलबजावणी करा, पुढील वर्षाची नवीन पुस्तके एप्रिल २०२० मध्ये उपलब्ध करा आणि शिक्षकांसाठी कालबद्ध पदोन्नती द्या अशा मागण्या त्यांनी केल्या.
 
 
@@AUTHORINFO_V1@@