रिया होती ‘या’ शिवसेना नेत्याच्या संपर्कात?

    07-Oct-2020
Total Views | 20

Rhea_1  H x W:
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलीवूडमध्ये मोठे वादळ तयार झाले. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्यासह ६ जणांची या प्रकरणावरून चौकशी करताना बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन बाहेर आले. त्यांनंतर त्यांना तुरुंगात धाडलेदेखील. मात्र, आता सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्ला याने रियाच्या शिवसेनेसोबत असलेल्या कनेक्शनचाही तपास करावा, असे एका न्यूज चॅनलला सांगितले आहे. यामुळे आता या प्रकरणामध्ये पुन्हा शिवसेनेचे नाव पुढे आले आहे.
 
 
याआधीही या प्रकरणामध्ये नेत्याचा हात असल्याचे बोलले जात होते. अशातच आता झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुशांतचा जवळचा मित्र सुनील शुक्लाने रिया चक्रवर्ती शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या संपर्कात होती, असा दावा केला. रिया चक्रवर्तीला लोणावळा येथील पवना लेक जवळ जमीन विकत घ्यायची होती. ही जमीन महाराष्ट्र वन विभागाच्या क्षेत्रात येते. यामुळे ही जमीन विकत घेण्यासाठी रिया चक्रवर्ती शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्या संपर्कात होती, असा दावा सुनीलने केला आहे.
 
 
त्याने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील जमीन खरेदी करण्यासाठी रियाने संजय राठोड यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्याने हा करार होऊ शकला नाही. याप्रकरणी सीबीआयने तपास करावा, अशी मागणी सुनील शुक्लाने केली आहे. अद्याप शिवसेना मंत्री संजय राठोड यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, सुनीलने दिलेल्या माहितीत तथ्य आढळल्यास रियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121