नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यामागे आपला हात असल्याचे पाकिस्ताने काबुल केल्यानंतर आता या हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भारतीय जनता पक्षाचे नेते हल्लाबोल करू लागले आहेत. माजी लष्कर प्रमुख आणि मोदी सरकारमधील विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. पुलवामा हल्ला सरकारनेच घडवून आणला असेल असा आरोप करणाऱ्यांना आता भरचौकात जोड्याने बडवलं पाहिजे, असा घणाघाती हल्ला सिंह यांनी चढवला आहे.
'सरकारनेच हा हल्ला घडवून आणला असेल असे बोलणाऱ्या आणि भगव्या दहशतवादाबाबत टिप्पणी करणाऱ्यांवर लोकांनी विश्वास ठेवता कामा नये. उलट मी असे म्हणेन की अशांना खुलेआम जोडे मारले पाहिजेत', असे वक्तव्य व्हि. के. सिंह यांनी केले आहे.१४ फेब्रुवारी २०१९रोजी पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवाल होता. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी तर या हल्ल्यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोप केला होता. निवडणुका जिंकण्यासाठी मोदी सरकारने हा हल्ला घडवून आणला असल्यचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच बालकोट हल्ल्याच्या पुराव्याची चौकशी करण्यासाठी आणि या हल्ल्याची माहिती मिळावी म्हणून एका संयुक्त राष्ट्र समितीची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.