खाते वाटपावरून महाविकास आघाडीत ‘बिघाडी’?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |

vijay_1  H x W:


सत्तास्थापनेनंतर खाते वाटपावरून महाविकास आघाडीत नाराजीचे सत्र सुरु झाले होते. अनेकांची नवे मंत्रिपदाच्या यादीतून वगळली गेल्यामुळे हे नेते काहीसे नाराज दिसत होते. शनिवारी अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा नाट्यानंतर आज राज्यातील कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार खाते वाटपावरून प्रचंड नाराज आहेत. खातेवाटपानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासही ते तयार नाहीत. 'आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,' अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.


राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी काही महिने विधानसभेत विरोधी पक्षनेते व सत्ताबदलानंतर पक्षाच्या कोअर कमिटीत सहभाग
, यामुळे त्यांना चांगले खाते मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना तेवढे महत्त्वाचे खाते न मिळाल्याने ते चांगलेच नाराज झाले आहेत. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन हे खाते देण्यात आले आहे.

@@AUTHORINFO_V1@@