सीएए-एनआरसी विरोधासाठी संजय राऊतांनी धरला मुस्लीम संघटनांचा 'हात'

    03-Jan-2020
Total Views | 2357


sanjaya raut_1  


'हिंदुत्ववादी' शिवसेना आणि 'जमात-ए-इस्लामी हिंद' एकाच मंचावर


मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात निदर्शने देशभर सुरू आहेत. त्यातच आता 'जमात-ए-इस्लामी हिंद' (जेआयएच) शनिवारी 'सीएए' आणि 'एनआरसी'विरोधात मुंबईत एक कार्यक्रम करणार आहे, यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतही सामील होणार आहेत. दिल्ली भाजपचे सरचिटणीस कुलजित सिंग चहल यांनी शिवसेनेच्या दुट्टपी भूमिकेवर टीकास्त्र सोडले.






शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास लोकसभेत पाठिंबा दर्शविला होता. परंतु महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा स्वीकारल्याने त्यांच्या दबावापोटी व मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी आपली भूमिका बदलली व राज्यसभेत मतदानाच्या वेळी 'वॉकआऊट' केले. यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात 'एनआरसी' लागू करणार नसल्याचे सांगितले होते.



'
सीएए'बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात हा कायदा लागू करायचा, कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत 'सीएए' आणि 'एनआरसी'विरूद्ध मोदी सरकारवर हल्ला करत आहेत. आता 'सीएए' आणि 'एनआरसी' या विषयावर 'जमात-ए-इस्लामी हिंद' मुंबई, मराठी पत्रकार संघ आणि 'असोसिएशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स' (एपीसीआर)चा संयुक्त कार्यक्रम शनिवारी सायंकाळी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकनजीक पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.



माजी न्यायाधीशांचा समावेश

'जमात-ए-इस्लामी हिंद'चे मुंबई अध्यक्ष म्हणाले की, " 'सामना'चे संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सीएए' आणि 'एनआरसी'विरोधात झालेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याबाबतचे आमंत्रण स्वीकारले आहे तसेच येण्याबाबत पुष्टीही केली. संजय राऊत यांच्याशिवाय या झालेल्या चर्चेत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, ज्येष्ठ वकील मिहिर देसाई आणि ज्येष्ठ वकील युसूफ मुचला आदी उपस्थित राहणार आहेत

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121