बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट

    22-Jan-2020
Total Views | 199

fire_1  H x W:



स्फोटात १ कामगार ठार तर ३ जखमी


मुंबई : बदलापूर एमआयडीसी परिसरात जे.के.रेमेडीज या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास कंपनीत स्फोट झाला. या तीव्र स्फोटामुळे विष्णु धडाम या ६० वर्षाच्या कामगाराचा जागीच मृत्यु झाला. आगीची माहिती मिळताच कुळगाव-बदलापूर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि एका तासाच्या अथक परिश्रमा नंतर त्यांना आगीवर नियत्रंण मिळवण्यात यश आले.

स्फोटाच्या घटनेत आणखी तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटाचा हादरा बदलापूर पूर्व परिसरातील आनंदनगर, शिरगाव, कात्रप मानकीवली, खरवई जुवेली आदी भागातील सुमारे तीन किलोमीटर परिसरात जाणवला. या स्फोटात विजयपथ पिंगवा हा कामगार (वय २०) ९० टक्के, झागरा मोहतो (वय ५६) ८०टक्के तर विनायक जाधव (वय ५६) हा कामगार ४० टक्के भाजला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या जखमी कामगारांना उपचारासाठी ऐरोली येथील बर्न केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121