पितांबरी देवभक्ती अगरबत्तीचा आविष्कार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |
 

सणांचा काळ समजल्या जाणाऱ्या चतुर्मासातल्या उत्तरार्धातले महत्त्वाचे सण म्हणजे गणपती , नवरात्र, दसरा , दिवाळी , आणि तुळशीचं लग्न... आपल्याकडे एक अतिशय आनंददायी आणि भारलेलं वातावरण असतं. घरोघरी आणि सार्वजनिक स्तरावरदेखील वेगवेगळ्या पूजा आणि व्रतांचं आयोजन होत असतं . पूजेच्या तयारीत अतिशय महत्त्वाचा असणारा आणि वातावरण प्रसन्न करून पूजेत मन एकाग्र करणारा घटक म्हणजे अगरबत्ती किंवा उदबत्ती . पूजेमध्ये अगरबत्तीचा वापर करण्यामागे शास्त्र काय आहे ते पाहू या. कोणत्याही देवतेच्या पूजेचा एक उद्देश असतो की आपण पूजा करीत असलेल्या देवतेच्या मूर्तीमधील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा. देवतांमध्ये पंचतत्त्वं असतात. त्यापैकी पृथ्वी तत्त्वाकडून गंध प्रक्षेपित होतो. हा गंध अतिशय सूक्ष्म असल्याने सामान्य जीवाला तो ग्रहण करता येत नाही. उदबत्तीमध्ये देवतांकडून प्रक्षेपित होणारे सूक्ष्म -गंध ग्रहण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे उदबत्ती लावल्यावर उदबत्तीच्या सुगंधासमवेतच देवतांकडून प्रक्षेपित झालेला सूक्ष्म गंधही वातावरणात प्रक्षेपित होतो आणि त्याचा लाभ पूजकाला , त्याच्या कुटुंबाला आणि वास्तूलाही होतो. त्याचप्रमाणे वातावरणात ज्या अदृश्य अनिष्ट शक्ती असतात त्यांचाही गंधाच्या सूक्ष्म कणांमुळे नाश होतो. त्यामुळेच वातावरणातला कोंदटपणा , निरुत्साह आणि अप्रसन्नता अगरबत्तीच्या सुगंधाने दूर होऊन प्रसन्नता व मांगल्य येते.





 

 

परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक अगरबत्त्यांचे सुगंध हे विविध रसायनांच्या मिश्रणातून कृत्रिमरित्या तयार केलेले असतात . त्यामुळे त्यातून प्रसन्नता , शांती मिळण्याऐवजी अनेकदा, गरगरणे , डोके दुखणे , असे त्रास होतात. अनेकदा या अगरबत्त्या कमी गुणवत्तेमुळे पूर्णपणे जळतही नाहीत किंवा त्यामुळे खूप प्रमाणात धूर निर्माण होऊन श्वसनाला त्रास होतो. याच समस्या ओळखून पितांबरीने फुलांच्या अस्सल नैसर्गिक अर्कापासून तयार केलेली देवभक्ती अगरबत्ती निर्माण केली. पितांबरीच्या दापोली येथील पितांबरी फार्म्सवर लागवड केलेल्या सुगंधी फुलांचा अर्क त्याच जागेवर असलेल्या प्रयोगशाळेत काढला जातो आणि त्यापासून तिथेच असलेल्या अद्ययावत कारखान्यात पि तांबरीची देवभक्ती अगरबत्ती तयार होते. इतकेच नाही तर या अगरबत्त्यांच्या काड्यांसाठी लागणारा बांबूदेखील पितांबरीच्या आसाम येथील केंद्रात तयार होतो. सोनचाफा, मोगरा, केवडा, रातराणी, चमेली, चंदन, गुलाब, लव्हेंडर आणि फ़्लोरल बुके अशा विविध सुगंधात तसेच २२ ग्रॅम, ८० ग्रॅम, १३० ग्रॅम, आणि २५० ग्रॅम अशा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये पितांबरी देवभक्ती अगरबत्ती उपलब्ध आहे. त्याशिवाय चंदन आणि लोबान सुगंधातल्या धूपस्टिक व धूपकप देखील उपलब्ध आहेत. सकाळच्या वेळी अगरबत्तीचा तर संध्याकाळच्या वेळी धुपाचा वापर करावा. अशी पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच घरी आणू या आणि चतुर्मासातल्या पूजांमध्ये नैसर्गिक सुगंधाचा आविष्कार अनुभवू या!








@@AUTHORINFO_V1@@