१ ऑक्टोबरपासून कर्ज होणार स्वस्त : मनमानी व्याजदर आकारणाऱ्या बॅंकांना चाप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : रेपो दरात कपात करूनही ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचा व्याजदर जैसे ठेवणाऱ्या बॅंकांना आरबीआयच्या एका निर्णयामुळे चाप बसणार आहे. १ ऑक्टोबरपासून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, वाहन कर्जांचे व्याजदर रेपो रेटशी संबंधित राहणार आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे आता स्वस्त होणार आहेत.



रिझर्व्ह बँकेने यापूर्वी बँकांना गृहकर्ज, वाहन कर्ज आदींसह एमएसएमई क्षेत्रातील कर्ज रेपोरेटशी जोडण्याचे निर्देशही दिले होते. मात्र, बॅंकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. बॅंकांना आता १ ऑक्टोबरची अंतिम मुदत दिली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार, किमान तीन महिन्यांतून एकदा व्याजदरात बदल करण्यात येतो.

 

रेपो रेट कमी केल्यानंतरही बँकांकडून व्याजदरात कपात होत नसल्याच्या तक्रारी आरबीआयला देण्यात आल्या होत्या. आरबीआयने यंदा सलग चारवेळा रेपो दरात कपात केली आहे. त्यानुसार १.१० टक्के व्याजदर कपात करण्यात आली आहे. मात्र, केंद्रीय बँकांनी केवळ ०.८५ टक्केच कपात केली आहे. १ ऑक्टोबरपासून सर्व बॅंकांना नवे व्याजदर लागू करण्याचे आदेश दिले असल्याने आता कर्ज स्वस्त होणार आहेत.

 
@@AUTHORINFO_V1@@