'तुफान' चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांची पसंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2019
Total Views |


'द स्काय इस पिंक' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त असलेल्या फरहान अख्तरच्या 'तुफान' या चित्रपटातील डॅशिंग लूक आज प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात तो एका बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमधील त्याच्या या लूकवर प्रेक्षक फिदा झाले आहेत. बॉक्सिंग च्या रिंगणात सराव करत असताना फरहान अख्तरचा हा डॅशिंग लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

'भाग मिल्खा भाग' नंतर पुन्हा एकदा एका खेळावर बेतलेल्या चित्रपटात फरहान काम करत आहे. मात्र हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारलेला नसल्याने या चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्यासमोर एक वेगळे आव्हान आहे. त्याची 'भाग मिल्खा भाग' मधील भूमिका कौतुकास पात्र ठरल्याने आता प्रेक्षकांच्या अपेक्षा आता नक्कीच वाढल्या असतील त्यामुळे या चित्रपटात तो काय कमल करतो हे पाहणे आता औत्युक्याचे असेल.

राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'तुफान' हा चित्रपट पुढील वर्षी २ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. तत्पूर्वी 'तुफान उठेगा' असे म्हणत फरहानाने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावरून पोस्ट केला.

@@AUTHORINFO_V1@@