मोहम्मद शमीला अटकेपासून तूर्तास दिलासा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीला तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. कौटुंबिंक हिंचासाराप्रकरणी जारी केलेल्या अटक वॉरंटला अलीपूर जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली. मोहम्मद शमीची पत्नी हसीनाने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक छळाचा आरोप केला. मागील आठवड्यात न्यायालयाने शमी आणि त्याचा भाऊ हासीद अहमदविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने मोहम्मद शमीला १५ दिवसांमध्ये आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. शमीचे वकील सलीम रहमान यांनी सांगितलं की, अलीपूर जिल्हा न्यायाधीश राज चट्टोपध्याय यांनी शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली. या खटल्याची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

गेल्या वर्षी शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरोधात मारहाण, लैंगिक छळ, हत्येचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करुन गुन्हा नोंदवला होता. दोघांच्या घटस्फोटाचा खटलाही न्यायालयात सुरु आहे. हसीन जहाँने शमीवर भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप केल्यानंतर दोघांच्या संबंधांत कटुता आली होती. मात्री बीसीसीआयच्या तपास समितीने शमीला आरोपांमधून क्लीन चिट देऊन हसीनचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगितले होते. तर मोहम्मद शमीनेही हसीन जहाँचे सर्व आरोप खोटे फेटाळले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@