अमेय खोपकरांच्या एव्हीके एन्टरटेनमेन्ट आणि स्कायलिंक एंटरटेन्मेंट प्रस्तुत महेश मांजरेकर दिग्दर्शित "दे धक्का २" च्या चित्रीकरणाला कालपासून लंडनमध्ये सुरुवात झाली. या आधी २००८ साली प्रदर्शित झालेल्या 'दे धक्का' चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती.
'दे धक्का' चित्रपटातून एका गावाकडच्या लहानशा कुटुंबाने मोठी मजल मारली होती. आता तीच भरारी आकाशात घेत महेश मांजरेकर 'दे धक्का २' मध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवला चित्रीकरणासाठी चक्क लंडनला घेऊन गेले आहेत. खरे तर विदेशातील चित्रीकरणामध्ये मराठी चित्रपट सुद्धा हिंदी चित्रपटांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवल्याप्रमाणे या चित्रपटात खूप नावाजलेले कलाकार काम करत आहेत. शिवाजी साटम, मेधा मांजरेकर, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पुढील वर्षी ३ जानेवारीला 'दे धक्का २' चित्रपट प्रदर्शित होईल.