'चांद्रयान-२'ने पाठविला चंद्राचा पहिला फोटो

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |


 

श्रीहरीकोटा : दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २० ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलेल्या भारताच्या चांद्रयान २ ने चंद्राचा पहिला फोटो काढला आहे. इस्रोने याबाबतची माहिती देत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोटो शेअर केला आहे . चांद्रयानाच्या विक्रम लँडरने चंद्रापासून 2650 किमीवरून हा फोटो घेतला आहे. बुधवारी हा फोटो घेण्यात आल्याचे इस्रोने सांगितले.

इस्रोने हा फोटो देताना दिलेल्या माहितीनुसार, या फोटोत चंद्राच्या पृष्ठावरील काही भाग स्पष्ट दिसत आहे. इस्रोने या फोटोत चंद्रावरील दोन प्रसिद्ध ठिकाणांचा उल्लेख केला आहे. ज्यात ओरियंटल बेसिन आणि अपोलोचे स्थान दिसत आहे.

 
 

 

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून २२ जुलै रोजी चांद्रयान २ चे प्रक्षेपण करण्यात आले होते. चांद्रयान 2 आणखी 4 टप्पे आणि कक्षा पार करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल. 7 सप्टेंबर रोजी लॅडर विक्रम त्याच्या ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर लॅडर विक्रम 7 सप्टेंबर रोजी चंद्राच्या जमीनीवर उतरेल. चंद्राच्या जमिनीवर उतरल्यानंतर 6 चाकाचे रोव्हर विक्रम लँडरपासून वेगळ होईल. यासाठी 4 तासांचा वेळ लागेल. हे ऑर्बिटर एक वर्षापर्यंत चंद्राच्या भोवती फिरणार होते. पण आता त्याचा कालावधी वाढवून दोन वर्ष करण्यात आले येणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@