तब्बल ४५ सामन्यानंतर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळवला जात आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी सामन्याला सुरुवात झाली असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाचीच निर्णय घेतला. सध्या मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफोर्ड येथे सामन्याची सुरुवात होण्यास काही मिनिटेच बाकी आहेत. भारताने वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे अव्वल स्थान पटकावले आहे आणि अशा तर्हेने रविवारी होणाऱ्या अंतिम सामान्यांपासून भारत आता फक्त १०० ओव्हरच्या अंतरावर येऊन पोचला आहे.
आजच्या सामन्यात बॅटिंग लाईन अपनुसार, रोहित शर्मा, के.एल.राहुल, विराट कोहली, रिषभ पंत आणि एम.एस. धोनी पहिल्या पाच क्रमांकावर खेळणार आहेत आणि त्यानंतर दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युझवेन्द्र चहल आणि जसप्रीत बुमराह हे फलंदाची करणार आहेत.
भारताने यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीपासूनच आपली पकड मजबूत केली असल्यामुळे भारतीय संघामधील आत्मविश्वास बळावलेल्या दिसून येतोय आणि परिणामी प्रेक्षकांच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत. उपांत्य फेरीचा दुसरा सामना परवा गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात होणार आहे.
The teams for the all important semi-final between India & New Zealand 😎😎 #TeamIndia #INDvNZ #CWC19 pic.twitter.com/SlXcC8VSJz
— BCCI (@BCCI) July 9, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat